Posts

फिर इंद्र का आसन डोलने लगा

जब वृत्त अही ने जल बांधा गगन मे तब इंद्र का आसन डोलने लगा । किया दुर्वासा ने त्रिलोक श्रीहीन तब इन्द्र का आसन डोलने लगा । जब पहुंचाया विश्वामित्र ने सशरिर त्रिशंकु को तब इन्द्र का आसन डोलने लगा। चली मेघनाद की माया तब इन्द्र का आसन डोलने लगा। हुई अहिल्या पत्थर तब इन्द्र का आसन डोलने लगा। विश्वामित्र, शरद्वात, यवकृत इनका तप बढ़ा तब इन्द्र का आसन डोलने लगा। शिव का जमाता खुद इंद्र बना तब भी वह आसन डोलने लगा। गया पृथु सिंहासन पर तब इन्द्र का आसन डोलने लगा। 60000 मारे कपिल ने इंद्र के चाल में, मार्कण्डेय ने गिनी चीटिया इंद्र बनी जो काल में। कान्हा के गोवर्धन पर इंद्र का घमंड चकनाचूर हुआ, हनुमान को वज्र प्रहार तो पवन ने ललकार दिया। शुक्र राहु की बनी युति तो लंपट राजा बने यहां। तप का ताप बढ़ाओ पंडे तब ही योगी बने यहां। इंद्र है मन में सब के , मुक्त करे वो योगेश्वर। योग का अनुशासन , चले सिर्फ मेरे अंदर। न कोई जुड़ाव , न कोई बाधा ,योगी पूरा,  न होय आधा । योग का केवल्य, स्वर्ग से बड़ा , तभी हर योगी इंद्र से लड़ा। कहे कबीरा  इंद्र दा राज काग की विष्ठा, ना भोगा इंद्राणी नूँ। सुखदेव पास पुर...

1996 by P. R. Taur

Image
 

शोध

 १६/१/९६ मंगळवार मी शोध घेतला तुझा  अथांग सागरात  झुळझुळणाऱ्या वाऱ्यात  हिरव्या पानात  गंध दरवळणाऱ्या फुलात  तेजाळणाऱ्या सूर्यात  चंद्र चांदण्यांच्या चांदण्यात  माणसाळणाऱ्या माणसात  प्रेमासाठी प्रेम देणाऱ्या   प्रेमासाठी प्रेम घेणाऱ्या   पशुपक्षांच्या प्रत्येक जीवात  प्रत्यक्षात तू कुठेच दिसली नाहीस  अनादी काळापासून तु  गुप्त आहेस  ह्या जगावर  राज्य करीत तणतणातून मनामनातून  

तू नसतेस तेव्हा

१६/१/९६  मंगळवार   दिवसाच्या वाटेवर जांभळाच्या किळसबनात  दिवस कलत जातो तू नसतेस तेव्हा  रात हि रडत असते  अंधाऱ्या वडाच्या सावलींगात काजव्यांचा नाच चालू असतो  आठवणींच्या भरात तू नसतेस तेव्हा  चंद्र हात आखडून चांदणे फेकतो  विरहाच्या वनामध्ये चाफा हि झुरतो तू नसतेस तेव्हा  हरपल्यागत सूर्य हि तेजाळतो  मी  मात्र  चोळीत बघतो  सूर्याच्या तेजात कळ्यांच फुलणे तू नसतेस तेव्हा    दिस येतो दिस जातो  दुष्काळाच्या सालागत .

तुझ्या स्वाभिमानाला

१६/१/९६  तुझ्या स्वाभिमानाला  माझ्या प्रतिक्षेची दया  येऊ दे  हट्ट तुझा भाबडा  तुटलाही  असेल  परिस्थितीच्या ओघात माझा तोल सुटलाही असेल  हात माझा तुझ्या पाठीवर रूतलाही असेल 

प्रतिक्षेतलं चांदण

 प्रतिक्षेतलं चांदण तुझ्या पोटात माझं काळीज वाढत आहे तू धेर्यवान पणा सोडू नकोस उतरू दे काळजात प्रतीक्षेच चांदणं विरहाच्या प्रदेशातलं निडरपणाच वागणं काळीज वाढवणारी सहनशिलता  उन्हाळे पावसाळे गुलाबी थंडीचं दिवस तुझ्या 

तू झालीस आई मी झालो बाप

तुझे समर्पण माझ्या ह्रदयात माझे समर्पण तुझ्या  ह्रदयात समर्पणात आपुल्या मरणाचाही शाप   तू झालीस आई मी झालो बाप  बीज तुझे माझे तुझ्या गर्भी अंकुरले  काळजाचा तुकडा आपुल्या  तुझे माझे रोप  तू झालीस आई मी झालो बाप  संस्काराची जननी तू मी जोपासणारा बाप  प्रतीक आपलया प्रेमाचे पदरात पडले माप  तू झालीस आई मी झालो बाप  नातं तुझं माझं जन्मांतरीच राहील  वारसाच्या रूपच प्रतीक प्रेमाचं प्रगटल होऊनिया युगांतराच अमर प्रेमाचं रूप  तू झालीस आई मी झालो बाप