तू नसतेस तेव्हा

१६/१/९६ 

मंगळवार 


 दिवसाच्या वाटेवर जांभळाच्या किळसबनात 

दिवस कलत जातो तू नसतेस तेव्हा 

रात हि रडत असते 

अंधाऱ्या वडाच्या सावलींगात काजव्यांचा नाच चालू असतो 

आठवणींच्या भरात तू नसतेस तेव्हा 

चंद्र हात आखडून चांदणे फेकतो 

विरहाच्या वनामध्ये चाफा हि झुरतो तू नसतेस तेव्हा 

हरपल्यागत सूर्य हि तेजाळतो 

मी  मात्र  चोळीत बघतो 

सूर्याच्या तेजात कळ्यांच फुलणे तू नसतेस तेव्हा  

 दिस येतो दिस जातो 

दुष्काळाच्या सालागत .


Comments

Popular posts from this blog

तू झालीस आई मी झालो बाप

तुझ्या स्वाभिमानाला

फिर इंद्र का आसन डोलने लगा