Posts

Showing posts from March, 2022

प्रतिक्षेतलं चांदण

 प्रतिक्षेतलं चांदण तुझ्या पोटात माझं काळीज वाढत आहे तू धेर्यवान पणा सोडू नकोस उतरू दे काळजात प्रतीक्षेच चांदणं विरहाच्या प्रदेशातलं निडरपणाच वागणं काळीज वाढवणारी सहनशिलता  उन्हाळे पावसाळे गुलाबी थंडीचं दिवस तुझ्या 

तू झालीस आई मी झालो बाप

तुझे समर्पण माझ्या ह्रदयात माझे समर्पण तुझ्या  ह्रदयात समर्पणात आपुल्या मरणाचाही शाप   तू झालीस आई मी झालो बाप  बीज तुझे माझे तुझ्या गर्भी अंकुरले  काळजाचा तुकडा आपुल्या  तुझे माझे रोप  तू झालीस आई मी झालो बाप  संस्काराची जननी तू मी जोपासणारा बाप  प्रतीक आपलया प्रेमाचे पदरात पडले माप  तू झालीस आई मी झालो बाप  नातं तुझं माझं जन्मांतरीच राहील  वारसाच्या रूपच प्रतीक प्रेमाचं प्रगटल होऊनिया युगांतराच अमर प्रेमाचं रूप  तू झालीस आई मी झालो बाप 

आजकाल , माझा देव

 आजकाल कुठं असतोस  तुझ्या चरणी श्रद्धा अर्पण करता करता अनेक पिढ्या तुझ्या आशेवर मातील विलीन झाल्या  आमच्या श्रद्धेचा धनी तू कुणाच्या तरी पोटाचं साधन बनलास प्रतिष्ठान बनून संस्थान बनून  १६/१/९६ माझा देव  माझा देव आज कुठे लपला  निळ्या निळ्या आकाशात काहो चुकला  अधर्माचा फास त्याला का नाही दिसला ? सत्याचा तू वाली आज का रे विसरला ? निर्मीयले जग आज कारे खवळले ? सत्य गेले उद्रेकात का नाही दिसले ? रूपांतराचे नाटक करून का रे थकला ? प्रतीक्षेत भक्ताच्या का दगडात बसला ?  निर्वाण पोकळीच्या रम्य प्रदेशातला आटपुन  पसारा पृथ्वीवरी लक्ष  दे अनादी ईश्वरा 

दिसमान

 ८/१/९६ रप रप झाल्यावर एखादी नाजूक येते सर  दिसमान बदलत असतात  एवढ मात्र खरं  पौर्णिमेचा चंद्र आमोशाला नसतो  सकाळचा सूर्यही अस्ताला झुकतो  उन्हाळ्यात पळणारे ढग  ज्येष्ठात जमतात  करपलेल्या मातीला  न्हाऊ असे घालतात  मृगजळ तेजातले  ऋतुचक्रात पाझरते  श्रावणाच्या सरीमधून हिरवे सपान ओझरते  निसर्गसारखे आपण श्रीमंत असले पाहिजे  दारिद्र्याच्या दरीमध्ये स्वतःला सावरले पाहिजे 

तुझ्याविना माझ्याविना

९/१/९६   आठवणीत प्रेमाच्या काळजात खुणा गाती  फुलरल्या दिसांच्या कथा ओळीने न्हाती  मनातल्या उसाची पिवळी पडली पाती  हरपल्या धारामधी  मंद गोदाईची गती  गंगथडीच्या ओढ्याकाठच्या डागवनाची झाली माती   लापाछपी मध्ये तिथे दिवसाच्या  होत्या  राती  बंधनात संसाराच्या  रेश्माच्या गाठी जपती  होऊन काळजाच्या सख्या रित्या आठवणी नांदती  बेधुंद त्या जमान्याच्या हरपलय चालीरीती  तुझ्याविना माझ्याविना पक्षी विरहाने गाती 

गंगेच्या किनारी

 १/१/९६ ओढ्याकाठच्या डागवनात  गंगेच्या किनारी  दाट झाडाझुडुपांमध्ये पिकल्यात बोरी   येति न्हालेल्या पोरी ।।१।। खाली बाभळीची सावली वर पाखरांची गाणी  गुराख्यांची पाऊलवाट कोल्ह्यांना असे चोरी  येति न्हालेल्या पोरी ।। २ ।। हळू टाका पाउल धांड मोडला नाजूक  पोटऱ्यात आली हिरवीगार ज्वारी  येति न्हालेल्या पोरी ।। ३।। बांधाबांधानेच चला काटा टोचेल अंगाला  लाल पिवळ्या फुलांचा कार्ड फुलला काटेरी  येति न्हालेल्या पोरी  ।।  ४ ।। दोन हिरव्या पाथ्यामध्ये बेल अस्तवात गेला  पिवळ्याधमक गोळ्यांनी देह भारावला  गाभुळत्या शेंदडाची चवच न्यारी  येति न्हालेल्या पोरी ।। ५।। थट्टा करील पायाची  हरभरा अमुसला  आम जाईल निघून पाण्यात बुडवा त्याला  टच  भरून घाट्यात हाक हाताला तो मारी  येति न्हालेल्या पोरी ।।  ६ ।। अशी नटली हि माती ऊत आलाय अंगाला  रंगरंगात भरतीचा हिवाळा आसुसला  गोडगुलाबी उबीचे मनि स्वप्न नाचते भारी  येति न्हालेल्या पोरी ।।  ७  ।।...