आजकाल , माझा देव

 आजकाल कुठं असतोस 

तुझ्या चरणी श्रद्धा अर्पण करता करता अनेक पिढ्या तुझ्या आशेवर मातील विलीन झाल्या 

आमच्या श्रद्धेचा धनी तू कुणाच्या तरी पोटाचं साधन बनलास प्रतिष्ठान बनून संस्थान बनून 


१६/१/९६

माझा देव 

माझा देव आज कुठे लपला 

निळ्या निळ्या आकाशात काहो चुकला 

अधर्माचा फास त्याला का नाही दिसला ?

सत्याचा तू वाली आज का रे विसरला ?

निर्मीयले जग आज कारे खवळले ?

सत्य गेले उद्रेकात का नाही दिसले ?

रूपांतराचे नाटक करून का रे थकला ?

प्रतीक्षेत भक्ताच्या का दगडात बसला ? 

निर्वाण पोकळीच्या रम्य प्रदेशातला आटपुन  पसारा पृथ्वीवरी लक्ष  दे अनादी ईश्वरा 



Comments

Popular posts from this blog

तू झालीस आई मी झालो बाप

तुझ्या स्वाभिमानाला

फिर इंद्र का आसन डोलने लगा