तू झालीस आई मी झालो बाप
तुझे समर्पण माझ्या ह्रदयात
माझे समर्पण तुझ्या ह्रदयात
समर्पणात आपुल्या मरणाचाही शाप
तू झालीस आई मी झालो बाप
बीज तुझे माझे तुझ्या गर्भी अंकुरले
काळजाचा तुकडा आपुल्या
तुझे माझे रोप
तू झालीस आई मी झालो बाप
संस्काराची जननी तू मी जोपासणारा बाप
प्रतीक आपलया प्रेमाचे पदरात पडले माप
तू झालीस आई मी झालो बाप
नातं तुझं माझं जन्मांतरीच राहील
वारसाच्या रूपच प्रतीक प्रेमाचं प्रगटल होऊनिया युगांतराच अमर प्रेमाचं रूप
तू झालीस आई मी झालो बाप
Comments
Post a Comment