दिसमान
८/१/९६
रप रप झाल्यावर एखादी नाजूक येते सर
दिसमान बदलत असतात
एवढ मात्र खरं
पौर्णिमेचा चंद्र आमोशाला नसतो
सकाळचा सूर्यही अस्ताला झुकतो
उन्हाळ्यात पळणारे ढग
ज्येष्ठात जमतात
करपलेल्या मातीला
न्हाऊ असे घालतात
मृगजळ तेजातले
ऋतुचक्रात पाझरते
श्रावणाच्या सरीमधून हिरवे सपान ओझरते
निसर्गसारखे आपण श्रीमंत असले पाहिजे
दारिद्र्याच्या दरीमध्ये स्वतःला सावरले पाहिजे
Comments
Post a Comment