तुझ्याविना माझ्याविना
९/१/९६
आठवणीत प्रेमाच्या काळजात खुणा गाती
फुलरल्या दिसांच्या कथा ओळीने न्हाती
मनातल्या उसाची पिवळी पडली पाती
हरपल्या धारामधी मंद गोदाईची गती
गंगथडीच्या ओढ्याकाठच्या डागवनाची झाली माती
लापाछपी मध्ये तिथे दिवसाच्या होत्या राती
बंधनात संसाराच्या
रेश्माच्या गाठी जपती
होऊन काळजाच्या सख्या रित्या आठवणी नांदती
बेधुंद त्या जमान्याच्या हरपलय चालीरीती
तुझ्याविना माझ्याविना पक्षी विरहाने गाती
Comments
Post a Comment