शोध

 १६/१/९६

मंगळवार

मी शोध घेतला तुझा 

अथांग सागरात 

झुळझुळणाऱ्या वाऱ्यात 

हिरव्या पानात 

गंध दरवळणाऱ्या फुलात 

तेजाळणाऱ्या सूर्यात 

चंद्र चांदण्यांच्या चांदण्यात 

माणसाळणाऱ्या माणसात 

प्रेमासाठी प्रेम देणाऱ्या  

प्रेमासाठी प्रेम घेणाऱ्या  

पशुपक्षांच्या प्रत्येक जीवात 

प्रत्यक्षात तू कुठेच दिसली नाहीस 

अनादी काळापासून तु 

गुप्त आहेस  ह्या जगावर 

राज्य करीत तणतणातून मनामनातून

 

Comments

Popular posts from this blog

तू झालीस आई मी झालो बाप

तुझ्या स्वाभिमानाला

फिर इंद्र का आसन डोलने लगा